Author Topic: चारोळ्या~बिरोळया 3  (Read 359 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
चारोळ्या~बिरोळया 3
« on: May 16, 2015, 10:22:57 AM »
 माती~~~
पावसाच्या थेंबागणिक
गंध मातीचा येतो
मनाच्या गूढगर्भी
अंतरात जातो

बालपणी कितिकदा
चिंब पावसात भिजलो
मातीच्या सुगंधाला
मनात साठवून राहिलो

जगणे ज़ुळलेले मातिशी
मातीतच शेवटी सरणे
मातीसोबत जगताना
ऋण मातीचे स्मरणे
--राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता