Author Topic: चारोळ्या ~ बिरोळया- 4  (Read 507 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
चारोळ्या ~ बिरोळया- 4
« on: May 16, 2015, 10:29:41 AM »
कुणीतरी असतं आपलं~~~

कुणीतरी असतं आपलं
आपल्यासाठी जगणारं
आपल्या दुःखात सहभागी
सुखाने सुखावणारं

कुणीतरी असतं आपलं
आपल्याशी भांडणारं
भांडता भांडता टचकन
डोळ्यात पाणी आणनारं

कुणीतरी असतं आपलं
भरभरुन प्रेम करणारं
आपल्यासाठी जगता जगता
आपल्यासाठी मरणारं

कुणीतरी असतं आपलं
गाणं ओठीचे गुणगुणणारं
काळजाचा ठाव घेऊन
अंतरात शिरणारं

कुणीतरी असतं आपलं
आपलेपणा जपणारं
तुझं-माझं सारं विसरुन
एकरुप होणारं
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता