नसलं जरी कुणी आपलं
आपणच आपलं व्हावं
कुढत-कुढत नाही
हसत हसत जगावं
नसलं जरी कुणी आपलं
मना खंत नसावी
ओघळलेलें अश्रु गाली
आपणच आपली पुसावी
कुणाकुणाच्या नशिबात
असेच जगणे असते
काही फुलांच्या नशिबी
अवेळीच सुकणे असते
नसलं जरी कुणी आपलं
मी तर माझा आहे
याच एका आधारावरती
मी अजून जिता आहे
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com