Author Topic: चारोळ्या~ बिरोळ्या -6  (Read 496 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
चारोळ्या~ बिरोळ्या -6
« on: May 28, 2015, 11:59:48 AM »
संघर्ष....

जीवन माझे संघर्षाचे
रोज रोज आव्हान नवे
जगून घेतो प्रत्येक क्षण
निसटणाऱ्या श्वासासवे

येणाऱ्या प्रत्येक संकटाशी
नव्या दमाने लढत असतो
रक्ताळलेळया जखमा घेऊन
पुन्हा पुन्हा धडपडत असतो

लढता लढता एक दिवस
श्वास ही माझा तुटून जाईल
काय सांगू माझ्या मरणाने
कुणा आनंदही भेटून जाईल
  --- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता