Author Topic: चारोळ्या-बिरोळ्या ~2  (Read 710 times)

Offline Rajesh khakre

 • Jr. Member
 • **
 • Posts: 167
चारोळ्या-बिरोळ्या ~2
« on: May 12, 2015, 07:17:22 PM »
चारोळ्या-बिरोळ्या ~2

विरह कधी कधी
अगदीच असह्य होतो
डोळ्यात थांबत नाही
अश्रुरूप घेतो...

आठवणी या सगळ्या
अशाच का असतात
जेव्हा ही येतात जवळ
मनाला दूर घेऊन जातात...

कुणावर ठेऊ विश्वास
सगळेच सारखे भासतात
काम झाले त्यांचे की
 माझ्यावरच हसतात

कुणाचा तरी खांदा हवा
आयुष्यात रडायला
हृदयीची वेदना
अश्रुंतून वाहायला

कुणीतरी असतं आपलं
भरभरुन प्रेम करणारं
डोळ्यातल्या भावना बघून
आपल्यात सामावणारं
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: चारोळ्या-बिरोळ्या ~2
« Reply #1 on: May 17, 2015, 04:43:45 PM »
khup sundar aahe..........

Offline Rajesh khakre

 • Jr. Member
 • **
 • Posts: 167
Re: चारोळ्या-बिरोळ्या ~2
« Reply #2 on: May 22, 2015, 01:22:29 PM »
धन्यवाद!!!!