मुलगा मुलीच्या घरी तिला 'पाहायला' गेला आहे. आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या
दोघांना 'एकटे' सोडतात.)
मुलगी : तुम्ही काय करता?
मुलगा (मिष्कील स्वरात) : आंघोळ!!!! (आता प्रश्न विचारण्याची त्याची पाळी. तो
विचारतो...) तुम्हाला काय येतं?
मुलगी (मिष्कीलपणे) : घाम!!!!
मुलगा (चपापतो, सावरतो) : अं, ते जाऊ दे. तुम्हाला गाता येते का?
मुलगी : हो....
मुलगा : मग गाऊन दाखवा ना!
मुलगी : बाहेर वाळत घातलाय!!!!!
मुलगा (आता पुरता फ्लॅट होऊन, कसाबसा) : वाळू दे, वाळू दे!
( मुलगी आत जाऊन मूठभर वाळू आणून त्याच्या हातात देते आणि तो बेशुद्ध
पडतो

....)
