अमेरिकेतील जपान- दुतावासात घडलेला एक सत्य(?) प्रसंग.....
जपानचे पंतप्रधान मोरी यांना अमेरिकेत जाऊन बराक ओबामा यांना भेटण्यापूर्वी प्राथमिक इंग्रजी बोलण्याचे धडे देण्यात आले.
त्यांना शिकवणाऱ्या माणसाने त्यांना सांगितले...
' तुम्ही जेव्हा ओबामांशी हस्तांदोलन कराल तेव्हा त्यांना विचारा, " हाऊ आर यु ? " (HOW ARE YOU ? )
' मग मि. ओबामा म्हणतील, "आय एम फाईन , अन्ड यु ? " ( I AM FINE , AND YOU ?) , या वेळी तुम्ही म्हणा, ' मी टु...( ME TOO ...)' यानंतरचे सारे काम तुमचा दुभाषा पार पाडील.
किती सोपं वाटत नाही......
आता नक्की काय घडलं ते ऐका....
मोरी जेव्हा ओबामांना भेटले तेव्हा त्यांनी विचारले , " हु आर यु ? ( WHO ARE YOU ?) ( त्यांना HOW ARE YOU ? विचारायचं होतं.)
ओबामा आश्चर्यचकित झाले, पण हसून ते म्हणाले, " वेल, आय एम मिशेल्स हसबंड, हा हा ...." ( WELL , I AM MICHELLS HUSBAND HA ... HA ....)
त्यानंतर मोरींनी प्रतिउत्तर दिलं,
" मी टू.......हा हा..... ( ME TOO ....HA HA ...)"
नंतर त्या खोलीत नुसती शांतताच पसरली......
( ई-मेल द्वारा....)