Author Topic: कोंबडी : आवडता पक्षी :)  (Read 4891 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
कोंबडी : आवडता पक्षी :)
« on: July 08, 2012, 03:54:05 PM »

मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात. कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझा आवडता पक्षी आहे.
...

कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला ते बनवता येत नाहीत पण खाता येतात.कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.

कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप


माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.

कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते.

पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना कोंबडीचोर म्हनत. चोरी करणे चूक आहे. चोरी केल्यावर आजकाल जेलमध्ये टाकतात. पुर्वी जेलमध्ये जाणे वाईट मानत व लोक त्यांचा तिरस्कार करत पण आज जेलमध्ये जाणार्‍याला लोक नेता म्हणुन निवडून देउन "लोकसभा" नावाच्या ठिकाणी पाठवतात. तिथे गेल्याने माणुस खुप श्रिमंत होतो असे माझे बाबा सांगतात.

कोंबदी अंडे देते. ते बहूपयोगी आहे. "आओ सिखाउ तुम्हे अण्डे का फण्डा" या गाण्यात त्याचे वर्णन आहे. त्या गण्यात मोनीका बेदी आहे. तिला जेलमध्ये अंडी देत होते. अंडे संडे या मंडे खाल्ले पाहीजे. मंडेला काही लोकांचा उपास असतो. नेल्सन मंडेला यांचा उपास असतो का हे मला माहित नाही. असो....कोंबडीचा बळी देतात. बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. कोंबदीला पळत जाऊन पकडने माणसाला हुशार बनवते.
« Last Edit: July 08, 2012, 03:55:39 PM by shardul »

Marathi Kavita : मराठी कविता