चंदूमल : गेले दहा वर्षं बॅचलर्स लाइफमध्ये घालवली. रोज घरातली भांडी घासणं, कपडे धुणं, त्यांची इस्त्री करणं, घर साफ करणं, बाजारहाट करणं, जेवण तयार करणं या सगळ्याचा एवढा कंटाळा आला... एवढा कंटाळा आला की या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी शेवटी मी लग्नच केलं.
नंदूमल : अरे यार, मलाही एक दिवस या सगळ्या कामाचा कंटाळा आला आणि....
चंदूमल : आणि काय?
नंदूमल : आणि मग माझ्या बायकोने मला डिवोर्स दिला.

****
बंड्या : अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलं कसं?
गण्या : काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या : काय सांगतोस काय!
गण्या : मग काय... सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद... दारू-सोडा, दारू-सोडा.
मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना.
