सूनबाई : सासूबाई अहो सासूबाई...
सासूबाई : काय बरं म्हणतेयस सूनबाई?
सूनबाई : किनई... हे अद्याप घरी आले नाहीत हो..
सासूबाई : अगबाई! तिन्हीसांजा उलटून गेल्या नाही?
सूनबाई : हो ना, मनात येतं.. मनात येतं की, कोणी दुसरी सटवी तर नाही ना यांच्या आयुष्यात... (आर्त हुंदका)
सासूबाई : जळळं मेलं तुझं लक्षणं. स्वत:च्या नवऱ्याबद्दल असा अभद्र विचार काय करतेस. अगं कदाचित कुठच्यातरी गाडी खाली चिरडलाही गेला असण्याची शक्यता असू शकते. पण तुम्हा आजकालच्या पोरींना नवरा घरी लवकर आला नाही की काहीतरी भलताच विचार करायची सवय लागलीय मुळी!
