कोकिळा बिघडली होती......
विन्या प्रधान पार्टीमध्ये रात्री उशिरापर्यंत 'रम'ला. लॅच कीने दार उघडून, बाहेरच कपडे चेंज करून हळूच दार उघडून बेडरूममध्ये शिरला. बिछान्यात शिरणार इतक्यात बेडरूमच्या घड्याळातली कोकिळा ओरडू लागली, ''कुक् कुक्, कुक् कुक्''... पहाटेचे चार वाजले होते. विन्याच्या डोक्यातलं विचारचक्र गरगरू लागलं, कोकिळा चारच वेळा 'कुक् कुक्' करणार. त्यानंतर आपण बेडमध्ये शिरणार. म्हणजे आपण पहाटेपर्यंत बाहेर उलथलो होतो, हे बायकोला कळणार. ती तमाशा करणार. हे टाळलं पाहिजे. क्षणार्धात त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली, 'आपणच कोकिळेचा आवाज काढून रात्रीचे १२ वाजवले तर!'
चौथ्या 'कुक् कुक्'नंतर बंड्याने पुढे आठ 'कुक् कुक्' केले आणि तो बिछान्यात शिरला. बायकोने विचारलं, ''किती वाजलेत?''
'' बाराच तर वाजतायत आत्ताशी,'' असं म्हणून विन्या झोपून गेला.
दुस-या दिवशी सकाळी बायको म्हणाली, ''हे घड्याळ दुरुस्तीसाठी नेलं पाहिजे.''
'' का गं?'' विन्याने विचारलं.
'' अरे, काल मध्यरात्री या घड्याळातली कोकिळा बिघडली होती. चार वेळा व्यवस्थित 'कुक् कुक्' केल्यानंतर ती 'ओह शिट' म्हणाली. नंतर तीन वेळा 'कुक् कुक्' केल्यावर तिने घसा खाकरला. आणखी तीन वेळा 'कुक् कुक्' केल्यावर ती कॉर्नर टेबलला अडखळली आणि शेवटचे दोन 'कुक् कुक्' केल्यावर चक्क शिंकली!!!!!!''
