कमाकाकू : काय सांगू तुम्हाला माझी व्यथा. आमच्या ह्यांना इतकी नखं कुरतडायची सवय आहे ना की काही कळतच नाही. चारचौघातही हे सतत नखं कुरतडत असतात. इतकी लाज वाटते म्हणून सांगू.
ठमाकाकू : अहो, इतकंच ना. तो काही विशेष मोठा प्रॉब्लेम नाहीय. अगदी सहज तो मिटवता येईल.
कमाकाकू : कसा हो.
ठमाकाकू : अहो आमचे हे... नेहमी नखं कुरतडायचे. मी दोनदा सांगून पाहिलं. तीनदा सांगून पाहिलं. शेवटी दिला एक ठोसा दातांवरच. समोरचे सगळे दात पडले. आणि मग....
नखं कुरतडणं कायमचं बंद झालं.