चिंगी : ओ बाबा बाबा बाबाआआआ...
बबनराव : काय गं चिंगे, काय झालं तुला.
चिंगी : मला कीनई काहीतरी सांगायचॉय...
बबनराव : हम्म्मं! काय ते?
चिंगी : इश्श्श्श्श
बबनराव : ...?
चिंगी : ते समोर रहाणारे बंडू.... आपलं बंडोपंतराव डोकफोडे आहेत ना, त्यांनी आणि मी ठरवलंय की लग्न करॉयच्चं!
बबनराव : तो येडा बंड्या? काय वेडबीड लागलंय का तुला. बर्र. मला एक सांग आधी. पैसे वगैरे आहेत का त्याच्याकडे.
चिंगी : छे बुवा. तुम्ही सगळळे पुरुष सारखेच. श्री बंडूपण तुमच्याबद्दल ऑस्सचं म्हणत होता.