एक माणूस फोनवर डॉक्टरांशी जिवाचा आटापिटा करुन सांगत होता, '' डॉक्टर माझी बायको गरोदर आहे, आणि तिच्या प्रसववेदना सुरु झालेल्या असून तिच्या डिलेव्हरीसाठी फक्त दोन मिनीट बाकी आहेत.''
'' हे तिचं पहिलं बाळ ना?'' डॉक्टरांनी विचारले.
'' मुर्खा!'' तो माणूस ओरडला, '' मी तिचं बाळ नाही तिचा नवरा बोलतोय!''