'ए मेरे वतन के लोगो' या प्रसिद्घ गीताचे संगीतकार सी. रामचंद यांना एकदा नेहरूंच्या भेटीचा योग आला. आढ्यापर्यंत गच्च पुस्तके भरलेल्या नेहरूंच्या अभ्यासिकेत त्यांनी प्रवेश केला आणि पुस्तकांकडे कुतुहलाने पाहू लागले. त्यावर पंडितजी मोकळेपणाने म्हणाले, 'ही समगळी मी वाचली आहेत, असं मात्र समजू नका!'