बारामतीला 'रसिकांच्या दरबारात राशीचक्रकार' या कार्यक्रमात लेखक अशोक शेवडे हे शरद उपाध्ये यांची मुलाखत घेत होते. उपाध्ये त्यांना म्हणाले, 'तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, आम्ही आमचं अध्यात्म सोडणार नाही.' शेवडे यांनी प्रश्न विचारला, 'तुम्हाला कोणता रंग आवडतो?' उपाध्ये म्हणाले, 'पांडुरंग'