वय
मोरारजी देसाई पंतप्रधान असताना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना विचारले, 'आपण आणखी पाच वषेर् पंतप्रधान राहणार का?' त्यावेळी मोरारजींचे वय ८२ वर्षे होते. मोरारजी म्हणाले, 'माझी प्रकृती चांगली आहे... आणि कॅलेंडरनुसार माझे वय १९ वर्षेच आहे.' मोरारजी देसाई यांची जन्मतारीख होती २९ फेब्रुवारी!