Author Topic: ग्राहक सेवा  (Read 2224 times)

Offline Prasad Chindarkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 80
 • Gender: Male
ग्राहक सेवा
« on: December 30, 2009, 03:24:06 PM »
ग्राहक सेवा-  हास्यरंग(लोकसत्ता)      
रविवार, १ नोव्हेंबर २००९

पिझ्झा असेल तेथून मागवूण खाणे ही आजची फॅशन! पुढील दहा वर्षांत ही सेवा कशी होईल? बहुधा असं असेल.
पिझ्झा ऑपरेटर : आमच्या हटला कॉल लावल्याबद्दल धन्यवाद! मी आपली काय सेवा करू?
ग्राहक : पिझ्झा ऑर्डर देण्यासाठी..
ऑपरेटर : आधी आपण आपला बहुपयोगी कार्ड नंबर सांगा.
ग्राहक : ओह!.. ७८९८९२३५७११, २१४९..४५..४५.
ऑपरेटर : तुम्ही श्रीमान देशपांडे आहात! तुमचं घर केशवनगर, चिंचवड येथे आहे. आपला टे.नं. ०२७६१२७७७००, मोबाईल..!
ग्राहक : बापरे! ही सर्व माहिती तुमच्याकडे कशी?
ऑपरेटर (थंडपणे) : तुमची सर्व जन्मकुंडलीच आमच्याकडे आहे साहेब!
ग्राहक : ओके मला सीफूड पिझ्झा पाहिजे.
ऑपरेटर : नको साहेब, आपल्या मेडिकल रेकॉर्डप्रमाणे आपल्याला हाय बी.पी. आणि कोलेस्टेरॉल आहे.
ग्राहक : ओ देवा! तसे असेल तर दुसरं कुठलं..
ऑपरेटर : लो फॅट पिझ्झा योग्य.
ग्राहक : आपण हे छातीठोकपणे कसे सांगता?
ऑपरेटर : परवाच तुम्ही नॅशनल लायब्ररीमधून पॉप्युलर डिश हे पुस्तक खरेदी नाही का केलं?
ग्राहक : ओके. तीन फॅमिली पॅक पाठवा.
ऑपरेटर : दहा माणसांच्या कुटुंबासाठी हे बरोबर आहे.
ग्राहक : मी रोख पैसे देऊ की क्रेडिट कार्ड चालेल?
ऑपरेटर : कार्ड! तुमच्या कार्डात हे वर्ष पूर्ण झाले तरी न फिटणारे कर्ज आहे साहेब!
ग्राहक : तसे असेल तर परत एटीएमला पळावे का?
ऑपरेटर : नको! आज आपण खूप पैसे काढलेत! एटीएमची मर्यादा ओलांडता येणार नाही.
ग्राहक : बरं बरं! आता तुम्ही किती वेळात पिझ्झा पाठवणार ते सांगा.
ऑपरेटर : पंचेचाळीस मिनिटे पाहिजेत साहेब! वाट पाहायची तयारी नसल्यास तुम्ही तुमच्या जुन्या स्कूटरवरून या.
ग्राहक : काय म्हणालात?
ऑपरेटर : आमच्या येथील रेकॉर्डप्रमाणे तुमच्याकडे १२२३० नंबरची जुनी स्कूटर आहे!
ग्राहक : अरे देवा!
ऑपरेटर : दुसरं काही विचारायचं का साहेब?
ग्राहक : पिझ्झाबरोबर सरबतच्या बाटल्या पाठवा, त्या फ्रीमध्येच आहेत ना?
ऑपरेटर : साधारणत: आम्ही ते देतो, पण आमच्या येथील रेकॉर्डप्रमाणे तुम्हाला शुगरचा त्रास आहे म्हणून..
(ग्राहक अर्वाच्य भाषेत शिव्या देतो.)
ऑपरेटर : जिभेला लगाम घाला साहेब! आठवण आहे का? १९८६ सप्टेंबर ७ तारखेला पोलिसाला तुम्ही शिवी दिल्यामुळे तुमच्यावर केस झालीय, तेही आहे रेकॉर्डवर..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,336
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: ग्राहक सेवा
« Reply #1 on: December 30, 2009, 07:38:33 PM »
 :D :D :D

Offline saayali_sachin

 • Newbie
 • *
 • Posts: 9
Re: ग्राहक सेवा
« Reply #2 on: January 02, 2010, 04:52:54 PM »

It's Toooooooo Good , Keep it up Nice one !

Deepa
« Last Edit: January 04, 2010, 08:08:29 PM by talktoanil »

Offline Prasad Chindarkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 80
 • Gender: Male
Re: ग्राहक सेवा
« Reply #3 on: January 02, 2010, 04:55:57 PM »

Thanx :)


Prasad 8)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):