एक वयस्कर (स्वभावाने पुणेकर) एका बँकेचा चेक घेऊन दुसऱ्या बँकेत भरायला गेले. 'चेक कॅश व्हायला दोन दिवस लागतील, मध्ये एक सुट्टी आहे' हे काही त्यांच्या पचनी पडलं नाही. समोरच बँक असल्याने झटपट व्हायला पाहिजे हा हेका आणि तरीही 'प्रोसिजर' असते हे समजावण्याचा बँकेतील कारकूनाचा प्रयत्न अशी जुगलबंदी रंगली. शेवटी बँकेच्या इरसाल कारकूनाने 'पुणे-अस्त्र'च काढलं. 'हे बघा, तुम्ही वैकुंठ स्मशानभूमीच्या दारात मेलात तरी थेट सरणावर चढवत नाहीत ना. आधी ससूनला नेऊन तपासतील, डेथ सटिर्फिकेट देतील, मग घरी नेऊन हार घालतील. नंतर वैकुंठकडे.'
Ref: Mata Online