केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या एका विद्यार्थ्याला डिपार्टमेंटमधल्या फ्रिजमध्ये एका खोक्यावर प्रा. विसरभोळ्यांच्या गाडीची चावी सापडली. प्राध्यापक
महाशयांच्या स्मरणशक्तीची ख्याती माहीत असल्याने त्याने ती प्राध्यापकांकडे सुपूर्द केली. सरांनी त्याचे आभार मानले आणि विचारले, कुठे सापडली चावी तुला? विद्याथीर् म्हणाला, फ्रिजमध्ये! विसरभोळे घाईघाईने म्हणाले, 'अरे, मग होती तिथेच ठेव. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज. तिच्यासाठी घेतलेला केक फ्रिजमध्ये आहे. विसरलो तर खैर नाही..'