आपल्या सुनेला हिणवण्यासाठी आणि मुलाचीही परीक्षा पाहाण्यासाठी आईने आपल्या मुलाला विचारले, ‘‘बेटा, जर मी आणि तुझी बायको आम्ही दोघी बुडायला लागलो तर तू कुणाला वाचवशील ?’’ तेवढ्यात सुनबाई म्हणाली, ‘‘हे पहा तुम्ही तुमच्या आईलाच वाचवा. कारण मला वाचवायला तर अनेकजण पुढे सरसावतील !’’