मानसशास्त्राचे प्राध्यापक वर्गात आले आणि फळ्याजवळ जाऊन शिकवायला सुरुवात केली. 'इथे ज्यांना ज्यांना वाटतंय की आपण मूर्ख आहोत, त्यांनी उभे राहा.' थोडावेळ वर्ग शांत राहिल्यावर गंपू उभा राहिला. 'म्हणजे तुला असं वाटतंय की तू मूर्ख आहेस?' 'नाही सर,' गंपू उत्तरला, 'पण तुम्ही एकटेच उभे आहात, हे मला बरं वाटेना!'