एका सुपरमाकेर्टमध्ये फिरत असताना गंपू अचानक एका सुंदर तरुणीकडे जातो आणि विचारतो, 'तुम्ही दोन मिनिटं माझ्याशी बोलू शकाल का?' त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक होतो. गंपू उत्तरतो, 'अहो, मी माझ्या बायकोबरोबर इथे आलोय. पण सध्या ती कुठेतरी गायब झालीय. पण मी कोणत्याही तरुणीशी बोलायला लागलो की मात्र ती कुठूनही तिथे येते!!!'