तडका - चिंता
कामापेक्षा चिंताच माणसाला जास्त छळते. कारण बहुतेक जण कामापेक्षा चिंताच जास्त करतात.
खसखस - कंजूष
कंजूष नातेवाईकाबरोबर आयुष्य काढणं कठीण असतं. पण कंजूष पूर्वजामागे आयुष्य काढण्यासारखी दुसरी चैन नाही.
तडका - फसवणूक
वर्तमानपत्र विकत एक लहान मुलगा ओरडत असतो, 'पंचवीस जणांना फसवले, पंचवीस जणांना फसवले!'
कुतुहलाने एक माणूस जवळ येतो, पेपर विकत घेतो. पहिल्या पानावर बघतो तर तो आदल्या दिवशीचा पेपर असतो. संतापून तो माणूस पेपरवाल्याला जाब विचारतो, 'कुठाय फसवणुकीची बातमी?' पेपरवाला त्याच्याकडे दुर्लक्ष करून ओरडायला सुरुवात करतो, 'सव्वीस जणांना फसवले, सव्वीस जणांना फसवले!'
रिपीट
नवरा : पुरुष एका दिवसाला १५ हजार शब्द बोलतात, तर बायका दिवसाला ३० हजार शब्द बोलतात.
बायको : कारण तुम्हा पुरुषांना प्रत्येक गोष्ट दोनदा सांगावी लागते!
नवरा : काय?