मराठी विनोद
रेल्वेच्या तिकीट चेकरने बाळूला पकडलं आणि डब्याच्या खिडकीला लोंबकाळून प्रवास केल्याबद्दल जाब विचारला. बाळू काही बोलणार त्यापूर्वी त्याने दोनशे रुपये दंडाची पावती बाळूच्या हातावर ठेवली. त्यावर बाळू म्हणाला, ‘‘मागच्या वेळी तर फक्त पंचवीस रुपये दंड केला होता यावेळी दोनशे का म्हणून ?’’ त्यावर तिकीट चेकर म्हणाला, ‘‘यावेळी तू फर्स्ट क्लासच्या खिडकीला लोंबकळून प्रवास करीत होतास.’’