हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, ‘‘ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.’’ वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला, ‘‘अरे, हे काय करतो आहेस ?’’
त्यावर तो वेटर म्हणाला ‘‘या बटनाबरोबर सुई-दोराही होता, तो शोधतोय !’’