वकील - ‘‘साहेब, माझ्या अशिलाच्या डाव्या हाताने चोरी केली अन तुम्ही सर्व शरीराला एक वर्षाची शिक्षा देताय ?’’ न्यायमूर्ती - (वकील विनोदाने बोलतोय असे समजून) ‘‘तर मग त्याच्या फक्त हाताला दोन वर्षाची शिक्षा देतो आता हाताबरोबर कसे जायचे हे त्याने ठरवावे.’’ वकीलाचा विनोद अंगाशी येऊन एक वर्षाऐवजी आता दोन वर्षाची शिक्षा झाली म्हणून इतर सहकारी वकील हसू लागले. तेवढ्यात आरोपीने आपला कृत्रीम हात काढून तो पोलिसांच्या स्वाधीन केला.