दिसणार नाही इतकं लहान असे नवीन श्रवण यंत्र श्रीमंत बाबासाहेबांनी विकत घेतलं. आठ दिवसांनी त्या दुकानदाराकडे जाऊन त्यांनी त्याचे आभार मानले. तेव्हा दुकानदार म्हणाला, ‘‘घरचे खूप खुष झाले असतील ना ?’’ ‘‘पण मी घरी सांगितलंच नाही. त्याचा मला खुप फायदा झाला. आठ दिवसात मी दोनदा माझे मृत्युपत्र बदलले.’’