संताला कुत्रा घेऊन फिरताना पाहून बंताने विचारले, ''तुझा कुत्रा चावतो का?''
संता म्हणाला, ''छे! अजिबात नाही.''
बंताने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला.
'' ओय ओय'' करीत बंता म्हणाला, ''तू काय म्हणालास तुझा कुत्रा चावत नाही!''
संता उत्तरला, ''पण, हा माझा कुत्रा नाही!!!!!''