ढमढेरे सर : बरं का मुलांनो, जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. याचा शोध १७७३ साली लागला.
पिंट्या : हुश्श! बरं झालं बुवा, मी १७७३ नंतर जन्मलो. त्याच्याआधी जन्मलो असतो तर मी श्वास कसा घेतला असता.
....
बँक मॅनेजर : अच्छा म्हणजे तुम्हाला आमच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट या नव्या डिपार्टमेण्टमध्ये नोकरी हवीय.
बबन : होय तर.
बँक मॅनेजर : बरं, मग मला सांगा. सायक्लॉन म्हणजे काय?
बबन : सोप्पाय, सायकल घेण्यासाठी कस्टमरला हवं असलेलं लोन.