बंता ज्युरॅसिक पार्क सिनेमा पहायला गेला होता. सिनेमा सुरू झाल्यावर सगळेजण डोळे फाडून त्यातली दृश्यं पहायला लागले. अचानक कॅमेरा डायनॉसॉरवर आला. तो पुढे येऊ लागला. ते पाहून बंता कमालीचा घाबरला आणि मागेमागे जाऊ लागला. तर मागे संता बसलेला.
संता : ओये पाजी क्या डर गये क्या? अरे भाई तो तर फक्त सिनेमाच आहे.
बंता : पता है जी पता है. हा सिनेमाच आहे हे मला ठाऊक आहे. पण ते त्या डायनॉसॉरला थोडंच ठाऊक आहे?