प्रामाणिकपणा
बऱ्याच वेळाने रेंजमध्ये आलेल्या गंपूच्या मोबाइलवर मित्राचा एसएमएस आला, 'ओळखीच्या व्यक्तीकडून मी विश्वासू आणि प्रामाणिक असल्याचं 'कॅरॅक्टर सटिर्फिकीट' नवीन नोकरीच्या ठिकाणी हवं होतं. त्यासाठी तुझी सही हवी होती, पण तुझा मोबाइल रेंजमध्ये नसल्याने तुझी सही मी करून टाकलीय!'