चिकट चिंगूमल आपल्या २० वर्षांच्या संसारानंतर पहिल्यांदाच चिंगीला घेऊन हॉटेलमध्ये येतो आणि कॉफी ऑर्डर करतो. एवढ्या वर्षांनंतर चिंगूमल पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर घेऊन आल्यामुळे चिंगी सॉलिड खूश झालेली असते. त्याच्याकडे प्रेमाने पाहत, अगदी सावकाश ती कॉफी पित असते. तेवढ्यात चिंगूमल तिला ओरडतो, 'अगं, लवकर पी ना कॉफी. नाहीतर थंड होईल.'
चिंगी : होऊ दे की मग?
चिंगूमल : अगं, अशी काय करतेस? मेन्यू कार्ड बघ. हॉट कॉफी २० रुपये, पण कोल्ड कॉफी ४० रुपये...