Author Topic: प्रश्न दुसरा-  (Read 1793 times)

Offline Swan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 50
प्रश्न दुसरा-
« on: March 02, 2010, 02:54:09 PM »
एका कॉलेजमध्ये वर्गात एक महत्त्वाची चाचणी परीक्षा घेण्यात येणार होती. पण राम- शाम- गणपत- दलपत हे चार मित्र रात्रभर मौजमस्ती करत फिरत होते व त्यामुळे परीक्षेची तयारी करू शकले नाही. परीक्षेच्या दिवशी सकाळी त्यांनी एक योजना आखली. चौघांनी तोंडाला माती फासली. कपडय़ावर ऑईल, ग्रीसचे डाग पाडून घेतले व अशा अवतारात पडलेल्या चेहऱ्याने प्रोफेसर समोर उभे राहून याचना करू लागले की, सर काल रात्री आम्ही एका लग्नाला गेलो होतो. येताना आमच्या कारचे टायर पंक्चर झाले. स्टेपनी पण नादुरुस्त होती म्हणून रात्रभर गाडी ढकलत- ढकलत हॉस्टेलपर्यंत आणावी लागली व म्हणून टेस्टसाठी तयारी करता आली नाही तरी आमची टेस्ट २-३ दिवसांनी घ्यावी. प्रोफेसर दयाळू होते त्यांनी संमती दर्शवली. तिसऱ्या दिवशी अभ्यास करून चौघे विद्यार्थी प्रोफेसरसमोर हजर झाले तेव्हा प्रोफेसरांनी एक अट घातली की तुम्हा चौघांना वेगवेगळ्या खोलीत बसून पेपर लिहावा लागेल. चौघे तयार झाले. प्रत्येकाला दोन प्रश्न असलेली १०० मार्काची प्रश्नपत्रिका दिली गेली.
प्रश्न पहिला- तुमचे नाव लिहा (दोन मार्क).
प्रश्न दुसरा- कोणते टायर पंक्चर झाले होते? (९८ मार्क)

Marathi Kavita : मराठी कविता