सुटे पैसे परत घेऊन दुसऱ्यानं ते हाफपँटीच्या खिशात टाकले. कोपऱ्यात उभ्या केलेल्या काठय़ा दोघांनीही घेतल्या आणि पुन्हा शिस्तीत चालू लागले. आता रस्त्यावरची वर्दळ वाढली होती. कसली कसली पोस्टर्स, जाहिराती यावर नजर टाकत ते रस्त्यानं चालत होते. मग दुसऱ्यानं अचानक पहिल्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, ‘ग्लोबल वॉर्मिगवर चर्चा झाली, यात तुला काय बरं वाटतं रे?’ पहिल्यानं खिशातून रुमालाची घडी काढली, नाक स्वच्छ केलं आणि म्हणाला, ‘एक तरी मुद्दा असा आहे, ज्यावर आपली काहीही भूमिका असली तरी मीडिया टीका करणार नाही आणि त्यात काय चर्चा झाली हेही कोणी विचारणार नाही? दुसऱ्यानं पहिल्याला एक असा लूक दिला ज्याचा अर्थ फक्त ‘आतल्या गोटातील’ लोकांनाच कळू शकेल!
तंबी दुराई