त्या विहीरीत नाणं टाकून एखादी इच्छा व्यक्त केली की, ती पूर्ण होते असा समज होता.
तो आणि त्याची बायको एक दिवस त्या विहीरीजवळ आले. त्याने खिशातलं नाणं विहीरीत टाकलं आणि डोळे मिटून मनातल्या मनात इच्छा व्यक्त केली.
मग त्याच्या बायकोनेही तसंच केलं. पण अचानक तिचा तोल गेला आणि ती विहीरीत पडली.
तेव्हा विहीरीकडे पाहून नमस्कार करीत तो म्हणाला, ‘देवा आतापर्यंत असल्या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता!’