Author Topic: ‘अरे, ते माझे आहे.  (Read 2205 times)

Offline Swan

  • Newbie
  • *
  • Posts: 48
‘अरे, ते माझे आहे.
« on: March 16, 2010, 01:43:50 PM »
भुसावळ- स्टेशनवर, सिग्नल मिळत नसल्यामुळे, रेल्वे खूप वेळ थांबली होती. पॅसेंजर वाट पाहून कंटाळले होते. तेवढय़ात गाडीतला एक पंधरा, सोळा वर्षांच्या दरम्यान असलेला एक तरुण त्या डब्यात फिरत म्हणाला, ‘हे पारकर पेन कुणाचे पडले आहे?’ एकजण म्हणाला, ‘अरे, ते माझे आहे, मी दोन दिवसांपूर्वीच विकत घेतले होते. तेवढय़ात खिडकीजवळ बसलेला एकजण म्हणाला, ‘अरे, ते माझे आहे, माझ्या मामांनी गेल्या आठवडय़ात वाढदिवसाचे प्रेझेंट दिले आहे. हँडल धरून उभा असलेला एक तरुण आपले खिसे चाचपडत म्हणाला, ‘अरे, ते माझे आहे.’ माझ्या बहिणीने मला वापरायला दिले आहे.’
शेवटी तो तरुण हसत हसत म्हणाला, ‘वारे खोटे मंडळी, कमाल आहे तुमची! या पेनचा मालक मीच आहे. बारावीच्या परीक्षेसाठी, माझ्या वडिलांनी मला आणून दिले आहे. ट्रेन खूप वेळ थांबली आहे, म्हणून जरा गंमत केली.’

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक पाच किती ? (answer in English number):