Author Topic: सर्वोत्तम मराठी विनोद...भाग १  (Read 3228 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...

       ऊंची !
एक अभियंता, एक गणितज्ञ व एक भौतिक शास्त्रातला तज्ञ एका खांबाजवळ उभे होते. त्यांना प्रश्न पडला होता कि या खांबाची ऊंची कशी मोजायची, असे कोणते सूत्र या खांबाची अचूक ऊंची काढून देईल ?
तितक्यात एक मराठीचा प्राध्यापक तेथे आला.
मराठीचा प्राध्यापक," काय झाल ? सर्वच काळजीत दिसताय ?"
अभियंता,"आम्ही या खांबाची ऊंची मोजण्या साठी एक सूत्र तयार करतोय. या सूत्राने याची अचूक लांबी मोजता येणार."
प्राध्यापक," त्यात काय एक्दम सोप आहे ते. मी तुम्हाला ती मोजुन दाखवतो."
मराठीच्या प्राध्यापकाने तो खांब तेथून काढला, जमिनीवर आडवा ठेवला, एक पट्टी आणली व मोजून सांगीतले १८ फूट व खांब परत जागेवर नेऊन ऊभा केला.
गणितज्ञ : अरे आम्हाला याची ऊंची मोजायची होती, याने तर खांबाची लांबी सांगितली !

मैत्री.
सांता ने नविन मोबाईल घेतला.
त्याच्या मित्रांनी मिठाई मागितली.
सांता बाजारात गेला. त्याच्याकडे फार पैसे नव्हते.
त्याने मोबाईल विकला.
आणि मित्रांना मिठाई खाऊ घातली .

बाळूचा अभ्यास
शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक :  बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस .  तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.
असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?
बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.

खोकला
बांता सांताला : तुझा खोकला कसा आहे ?
सांता : खोकला थांबला पण अजुनही श्वास घेताना त्रास होत आहे.
बांता : काळजी नको करु, एक दिवस श्वासही थांबेल.