Author Topic: सर्वोत्तम मराठी विनोद...भाग २  (Read 3125 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...

     जन्म.
बांता : ऑक्सिजन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. या वायूचा शोध १७७३ साली लागला.
सांता : अरे देवा, बरं झाल माझा जन्म त्यापुर्वी नाही झाला.

आजार ?
डॉक्टर : तुम्हाला मलेरिया झाला आहे.
रुग्ण : डॉक्टर, खरच मलेरिया झालाय ना ? एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत पण तो टॉयफाईडने मेला.
डॉक्टर : नाही, माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात.

पेपर !
बाबा : काय रे बाळू, आजचा पेपर कसा होता ?
बाळू :  बाबा, प्रश्न तसे सोपे होते पण त्यांची उत्तरे फार कठिण होती.

सुंदर बाई !
नवरा घरी आल्यावर....
बायको : अहो,  मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली.
नवरा : मग काय केल तु ?
बायको : काही नाही, थोड्या वेळाने मी आरश्या समोरुन बाजुला झाले.

डॉक्टर सांता.
डॉक्टर सांताने फार गंभीर चेहरा करुन हातात टॉर्च घेऊन पेशंटचे डोळे तपासले, जिभ बघितली, कान तपासले आणी.........
बराच विचार करुन म्हणाला..........
.
.
.
टॉर्च चांगला आहे !!!
__________________________________________________________
from internet
« Last Edit: October 02, 2010, 02:35:37 AM by pomadon »