हत्तीचं डासिणीवर
एकदा एका हत्तीचं एका
डासिणीवर (म्हणजे डासाची मादी)
प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं
अफेअर जोरात चाललं. सगळ्या
जंगलात या प्रकरणाची चर्चा
गाजत राहिली. अखेर हत्तीनं
डासिणीच्या वडिलांना भेटून
तिला रीतसर मागणी घातली. पण,
तिच्या घरच्यांनी लग्नाला
प्रचंड विरोध दर्शवला.... का?....

....
सांगा सांगा का?
अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक
आहे, मुलाचे दात फार पुढे
आहेत!''
तरीही, घरच्यांच्या
विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न
केलं. पण, लग्नाच्या पहिल्या
रात्रीच डासिणीचा मृत्यू
झाला...
... का?...

...
...
...
...
विचार करा...
...
...
...
अहो, भलतेसलते विचार करू नका!
हत्तीला रात्री 'गुडनाइट'
लावून झोपायची सवय होती!!!! .
