Author Topic: विनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका  (Read 15846 times)

Offline RohitDada

  • Newbie
  • *
  • Posts: 23
  • Gender: Male
**************विनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका*************

अ) १ ) …. थोडक्यात उत्तरे लिहा ….

प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.

... प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.

प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.

प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर – मेव्हणी

प्रश्न – कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर – अमिताभ बच्चन.

प्रश्न – उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर – उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.

प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.

प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.

प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.

प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.

प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर – चार.

ब ) १ ) प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे २ उदाहरण सांगा ?

उत्तर १ – अर्थाअर्थी अर्थ नसलेल्या अर्थशुन्य अर्थकारनाचा अर्थपूर्ण अर्थसंकल्पाशी अर्थाअर्थी अर्थ जोडून अर्थाचे अनर्थ करण्यात काय अर्थ आहे अर्थमंत्री साहेब?
उत्तर २ – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते.

क ) १ ) अपूर्ण गाणी/म्हणी पूर्ण करा. ….

प्रश्न – देखा है पहली बार ……………
उत्तर – उद्धव के घरमे पवार… कसके पकड़, कसके पकड़.

प्रश्न – पाण्यातला मासा झोप घेतो कैसा …………
उत्तर – खावे त्याचा रस्सा तेंव्हा कळे .
…………………………
ड) व्याख्या करा .

१) प्रकाशवर्षाची व्याख्या करा .
उत्तर – अनवाणी पायाने प्रकाश एका वर्षात जेव्हड़े अंतर पायी-पायी चालत जातो त्या अंतरास प्रकाश वर्ष म्हणतात.

२) महागाईची व्याख्या करा ….
उत्तर – ज्या गायी शरीराने महाकाय असून जास्त
चारा खावून कमी दुध देतात त्यांना
महागाई म्हणतात.

क ) १) तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा.
उत्तर -
…….. काय झालं ?
…….. बाळ रडत होतं.
…….. एक कानशिलात दे त्याच्या.
…….. तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते.

ख ) १ ) अपूर्ण वाक्ये पूर्ण करा. ….

प्रश्न – पुरुष मोर्च्याचा नारा – हम सब ……………
उत्तर – नालायक है.

प्रश्न – महिला मोर्च्याचा नारा – हमारी मांगे …………
उत्तर – भरा करो.


Offline Yogesh Dalvi

  • Newbie
  • *
  • Posts: 15
Jabardasta...!!!

Offline raviraj khilare

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Chaan...!!!

Offline justsahil

  • Jr. Member
  • **
  • Posts: 50
  • Gender: Male
mast.....

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,673
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
dhmal ali vachun.....

Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 851
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
hahahaahaa mi pan ashich uttare lihaycho..............


yaaadav

  • Guest
:D :D :D :D
KHUP CHAN AAHE HE प्रश्नोत्तर पत्रिका MALA PARIKSALA BASACHA AAHE....

tushar PORLEKAR

  • Guest
 AMAZING JOK'S .  :D :D :D :D :D :D :D :D

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,422
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
उत्तर १ – अर्थाअर्थी अर्थ नसलेल्या अर्थशुन्य अर्थकारनाचा अर्थपूर्ण अर्थसंकल्पाशी अर्थाअर्थी अर्थ जोडून अर्थाचे अनर्थ करण्यात काय अर्थ आहे अर्थमंत्री साहेब?
उत्तर २ – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते.

mast..... :D :D :D

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):