Author Topic: माझ्या आठवणीतला एक क्षण.........  (Read 4495 times)

Offline balrambhosle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
  पाहिलं वर्ष म्हणजे संकटाच नव्हे तर मज्जा पण खूप होती. ते कस माहित आहे का दिवस भर कॉलेज बोर मारायचं आणि होस्टेल वर सिनिअर बोर मारायची आणि ह्या दोघांना पण डिचू देण्यात आम्हाला मजा यायची. होस्टेल वर गेलो कि काय व्हायचं काही मुले लायब्ररीत पळून जायची तर काही होस्टेल वर रूम मध्ये बसायची आणि त्यांची मित्रे बाहेरून लॉक लावून जायची. आणि त्यात आम्ही दोघे म्हणजे लायब्ररीत जायच्या बहाण्यान बाहेर पडायचो आणि उनाड रस्त्यावर वेड्यासारखे फिरायचो पण त्यासाठी पण आम्हाला करमणुकीच साधन पाहिजे होत. आणि ते पण आम्ही शोधून काढल. असच एकदा लायब्ररीत जाण्यासाठी निघालेलो आम्ही भाभिच्या दुकानं समोरून जात होतो. भाभी म्हणजे तिथ एक किरकोळ विक्री करणार मुस्लीम कुटुंब होत आणि ती स्त्री दुकानावर बसायची म्हणून मुलांनी तीच नाव भाभी पाडलं. ते आताच नाही तर खूप जून दुकान होत. जिथून मुले रोज छोटय छोट्या वस्तू विकत घ्यायचे मग ते काही पण असो. हा तर मग आमचा प्रसंग असा झाला कि रस्त्यावरून चालत असतानाच माझ लक्ष भाभी च्या दुकानाकडे गेल दुकान बघतच माझ्या दिमागात एक गोष्ट आठवली. काय झालते एकदा मला एक सिनिअर ने सिगारेट आणण्या साठी भाभिच्या दुकानी पाठवले होते त्यावरूनच मला सिगारेट ओढायची इच्छा झाली. तसं मी बारावीपासूनच ओढायचो पण भरपूर दिवस झालते मी ओढली नव्हती.
मग मी सहज प्रमोदला विचारलं " अरे प्रमोद तू कधी सिगारेट ओढली आहेस काय'
 तो म्हणाला "नाहीरे, पण तू अस का विचारतोयस, तू ओढ्लास का कधी?"
मग मी पण म्हटले "नाहीरे. मी पण नाही कधी ओढली, ते काय झालते कि मला एका सिनिअर ने सिगारेट आणायला पाठवले होते म्हणून आठवण झाली कि इथे मिळते म्हणून."
मग तो परत गंमतीने विचारायला लागला, " तुला माहित आहे का ती कशी लागते ते?, चाल घेऊन बघायची का?"
मी मनातल्या मनात हसलो आणि म्हणालो "नाहीरे मला पण माहित नाही, अरी किती जन ओढतात सिगारेट, त्यात काय मज्जा असते हे पण आपल्याला माहित नाही, चाल मग आपण हा अनुभव घेऊनच बघूया कि काय होतंय"
मग आम्ही एक सिगारेट आणि एक काढ्याची पेटी विकत घेतली आणि दूर झाडांच्या आडोश्यात जावून बसलो कुणी सिनिअर बघू नये म्हणून.
मग आम्ही एकमेकाला आग्रह करू लागलो कि तू आधी ओढ मग मी ओढतो. पण दोघे पण सुरुवात करायला लाजत होतो कारण काय वाटायचं कि समजा हा जर चांगला मुलगा असला आणि सिगारेट ओढत नसला तर माझी घाण सवय बघून तो आपल्या सोबत नंतर राहणार नाही. शेवटी प्रमोद ने ती सिल्गावली आणि एक छोटासा धुराचा श्वास सोडला. मग मी पण हळू सिगारेट ओढता येत नाही असे नाटक करत हळू धूर तोंडातून बाहेर टाकला. त्यान पण तसेच केले. आमच्या एकमेकांच्या चालणाऱ्या नाटकावरून मला कळले कि तो पण सिगारेट ओढत होता. मग मी लांब श्वाश घेतला आणि धूर आतपर्यंत घेतला आणि सोडला आणि त्यान पण तसेच केले.
मी त्याला हसत हसत विचारले " प्रमोद तू या आधी ओढत होतास न?"
त्याने पण मला विचारले " तू पण ओढत होतास न?"
मग शेवटी दोघांची पण तोंडे उघडली आणि आम्ही आपली आपली असलीयात सांगितली कि आपल्याकडे किती सवयी आहेत.