प्रिय मित्रहो,
सर्वांनाच नमस्कार...
कदाचित आपली ओळख असेलही किंवा नसेलही. ही एक आमंत्रण पत्रिका आहे, आपणा सर्वांना
http://www.marathikavita.co.in या मराठी कवितांच्या संकलन असलेल्या वेबसाईटचे सदस्य होण्यासाठी, या वेबसाईट वर आपणांस कवितांसोबतच आणखी बरीच व्यासपीठं उपलब्ध होऊ शकतात. उदा. लहान-मोठ्या कविता, चारोळ्या, चर्चासत्र, कथा, लघु कथा , विनोद, उखाणे,मराठी म्हणी इ. जेणे करून आपणा सर्वांच्या माहितीच्या आधारे ही वेबसाईट मराठी विश्वात एक अन्यन्य साधारण महत्व प्राप्त करू शकते आणि त्यातून आपल्या सभासदांनाही पुढे चालून प्रगतीकरण्यास अधिक वाव मिळू शकतो.
"व्यक्ती तितके विचार" या वाक्या प्रमाणेच आपण यात असलेल्या विषयांवर आपले मत मांडून चर्चासत्रात सहभागी होऊ शकतात.
या वेबसाइटला भेट दिल्यावर आपणांस सहजपणे समजेल अश्या पद्धतीने सुरुवातीला काही मोजकी माहिती भरून सदस्य होता येईल. त्यानंतर आपण फक्त आपले Username आणि Password टाकून login करू शकतात.
वेबसाईट चे सदस्य होण्यासाठी काही मोजकेच नियम देखील आहे तेही आपण पाळाल अशी अपेक्षा आहे. ते पुढीलप्रमाणे:-
1) दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका
2) पोस्ट झालेल्या कवितांचा पुरेपूर आनंद घ्या. कविता वाचून झाल्यावर आपल्या सवडी प्रमाणे प्रतिक्रिया द्यावी. अथवा आपण कवितेतल्या चुकाही सांगू शकतात.
3) चर्चा सत्रात फक्त वाद-विवाद न रहाता, जर संवाद झाला तर चर्चासत्र बहरेल यात शंकाच नाही. प्रत्येक व्यक्तिला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो त्याचा त्याने वापर हा केलाच पाहिजे.
4) शक्य तितके मराठीत आपले मत मांडण्याचा प्रयत्न करावा. मराठी टाइप करण्यासाठि आपण .
www.quillpad.com /
http://www.google.com/transliterate/ या वेबसाइटचा उपयोग करू शकतात.
5) कवितेच्या अथवा कथा, गोष्टी यांच्या शेवटी मुळ कवि-लेखकाचे नाव ज़रूर टाकावे. शक्य असल्यास तारीखही. कृपया दुस-याची कविता, गोष्टी आपल्या स्वत:च्या नावने टाकु नये.
6) आपले मत योग्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. एकमेकांत संवाद करा, अनावश्यक गोष्टिंवर वाद घालु नये.
7) जात, धर्म, वर्ण, पंथ अथवा व्यक्ति याबाबत अपमानस्पद भाष्य टाळावे.
-- Author Unknown*हि कविता तुमची असल्यास आम्हाला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.