लेक पाहिजे होती खरी
पण मनातून मुलगाच हवा होता
बाल जन्मल्यावर पेढे वाटतानाचा
आनंद काही औरच होता...
जरी मुलगा मुलगी समान तरी
दोघांना वेगळेच सांभाळावे लागते
लोकांच्या नजरेच्या तड्यापासून
तिला वाचवावे लागते...
लहानपण अगदी लाडीगोडीत
येऊन जात असते
पण शिक्षणाच्या बाजारात
मुलालाच शिकवावे वाटते...
मुलगी शेवटी परक्याचे धन
हेच का खरे वाटते
मुलगा आपल्याजवळच राहील का
ह्याला उत्तर नसते..
जावयाशी पण
खूप जपून वागावे लागते
जरी सून तोडून बोलली तरी
समजून घ्यावे लागते..
जीव लावायला एक तरी
लेक असावी वाटते
पण मनाजोगते आयुष्य
तिला जगायला मिळेल का याची शंका वाटते !