ॐ साईं .
तो एक वेगळाच पाऊस......!!! ©चारुदत्त अघोर.(१५/४/११)
होती ती एक भयंकर, वादळाची रात्र,
एकटा मी रस्त्यावर,कोणीच नाही इतरत्र;
रात्री हरवून फिरायचे,मनातलं एक खूळ,
समोर पाहताच,डोळ्यात कचरत होती धूळ,
मन पण उत्साहाने झालं होतं बेभान,
हृदयी याही पेक्षा होतं,जोर्याचं थैमान;
एकाकी वारा रुपांतरीत होऊन, बरसल्या धारा,
बोचरे थेंब अंगी रुतून,तडकल्या गारा;
कुठे जावं काही कळेना,कारण पाउस धुवाधार,
पुढे बघावं तर पापण्यांवर, पाण्याची घसरती तार;
कशी वेळीच पावसानं, संधी धरली,
अंगी हूडहुडून कापराने, थंडी भरली;
सहजच धावत एका,दिसल्या घरा कडे पळलो,
थोड्या समोर आलेल्या,पडवी खाली वळलो;
किंचित कोरड्या दिसल्या, जागी थांबलो,
कापरं असल्यानं,थोडं जास्तच दमलो;
न जाणे घरातून एक कुठला, मंजुळ स्वर येत होता,
माझा कापरं सहजच थांबून,चित्त तिकडे नेत होता;
उस्फूर्त पणे नजर, प्रकाशित खिडकी कडे स्थिरावली,
बंद काचेतून एक,केस पुसणारी सावली भिरकावली;
कोण असेल ती,या विचारानं मन बेचैन वादळलं,
ठोक्यांचं जड वजन,वेगानं हृदयी आदळलं;
वाटलं एकदा त्या,खिडकीला द्यावी थाप,
तेव्हाच बंद होईल,अविरत हृदयाची धाप;
विचारीत मनानं कधी घरी आलो, कळलंच नाही,
मन जे खिडकीत स्थिरावलं, ते अझून वळलंच नाही;
त्या रोमांचित क्षणांचा अनुभव,वाटतं परत घ्यावा,
ती रात्र आणि तसाच तो पाऊस, एकदा परत यावा.
कितीही आठवलं तरी, भागत नाही स्वप्नीहि ती हौस,
वेडावून गेला जीवाला, तो एक वेगळाच पाऊस......!!!
चारुदत्त अघोर.(१५/४/११)