Author Topic: हताश !!!  (Read 509 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
हताश !!!
« on: November 14, 2014, 02:06:26 PM »
हताश
का जखमांचे ओझे ऊरी वाहतो मी?
का मलमांचे लेप पुन्हां लावतो मी?
जगण्यात मौज मोठी काय कळणार तुला?
चटके ऊन्हाचे का ऊगा सोसतो मी?
दोन दिवसांचे आयुष्य आहे फुलांना
सुगंधात सारे भिजवून टाकतो मी
ऊठ वेड्या नको हताश होऊ तू एवढ्यात
सारे जीवन ओवाळून टाकतो मी
सकारात्मक थोडे जगुन पहा
नकाराचे हे दान तुजकडे मागतो मी

श्री.प्रकाश साळवी
दि.14/11/2014

Marathi Kavita : मराठी कविता