Author Topic: मस्तकलंदर.........!!!  (Read 749 times)

Offline avinash.dhabale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 55
मस्तकलंदर.........!!!
« on: February 23, 2012, 10:37:46 AM »
नदी तर वाहणारच तिला कोण रोखणार,
सूर्य तर   तळपणारच  त्याला कोण अडविणार,
हि तर सुरुवात आहे अजून जग जिंकायचे आहे,
मस्तकलंदर  आम्हाला कुठे कोण रोखणार....

असतीलही  निर्बंध जगात आम्हास त्याचे काय,
स्वच्छंद स्वैर विचारांकडेच आमचा  पाय,
तारुण्य रंग उधळीत आम्ही गरजणार,
मस्तकलंदर आम्हाला कुठे कोण रोखणार.....

तरुण्यासागाराल या काठाचा कुठे अडकाव,
तिमिर गाजवू आम्ही जिथे तिथे शिरकाव,
जिंकणार फक्त जिंकणार आणि जिंकतच राहणार,
मस्तकलंदर आम्हाला कुठे कोण रोखणार.....
मस्तकलंदर आम्हाला कुठे कोण रोखणार......


**********अविनाश**********

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मस्तकलंदर.........!!!
« Reply #1 on: February 23, 2012, 12:34:23 PM »
mast kalandar..... kavita chan aahe.

Offline avinash.dhabale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 55
Re: मस्तकलंदर.........!!!
« Reply #2 on: February 23, 2012, 12:49:33 PM »
thank you.....!!