Author Topic: !! हे सृष्टी !!  (Read 658 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
!! हे सृष्टी !!
« on: December 06, 2013, 10:22:48 PM »
!! हे सृष्टी !!


रेंगाळणाऱ्या पावसाला,
सूर होता सरींचा !
मातीलाही गंध होता,
पावसाच्या फेसाळण्याचा !

कौतुकाचे थेंब घेऊन,
तरू हि भरलेला !
हिरवाई घेऊन जशी,
लेक आली माहेराला !

इंद्रधनु थेंबानी,
अंकुर हे डवरलेले !
बाळाच्या चाहुलीने,
मातृ नेत्र पाणावलेले !

रंगाची सप्तमी व्हावी,
फुल-पाखरू गीत नवे !
हे सृष्टी, तू आम्हास,
दान हे नित्य द्यावे !©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता