Author Topic: !! अधीर चित्त ... !!  (Read 596 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
!! अधीर चित्त ... !!
« on: March 07, 2014, 04:06:04 PM »
अधीर चित्त ... .
.
.
मृगये परी तव गाठले रण्य
तिमीरावरी ते रूप नगण्य
हाती घेऊन अघोर कोदंड
तीराने माझ्या कापले खग
.
खजीटर व्हावे तव मज मी
पाहून तडफडते नाजूक द्विज
विषाद व्हावे तव मनात मी
पीयुष पहावे वाचवण्या परी खग
.
विपूल विचार मनात माझ्या
का मी सैर व्हावे परी खग
का आसूड घ्यावा आवेशात मी
का मी भासावे मग घृण
.
असे कसे हे रूप मनाचे
कधी ऊनाड ते कधी सुज्ञच व्हावे
मग मी स्वत:स प्रश्न करावे
मनोहर मन हे मुर्ख असावे
.
© चेतन ठाकरे
दि. : 02-3-14
( अधीर : चंचल, चित्त : मन, मृगया : शिकार, रण्य : वन, अघोर : भयानक,
कोदंड : धनुष्य, खग : पक्षी, द्विज, ऊनाड : भटक्या, पीयुष : अमृत, आवेश : ऊत्साह,
मनोहर : सुंदर, सुज्ञ : शहाणा, विषाद : दु:ख, विपूल : अनेक.)

Marathi Kavita : मराठी कविता