Author Topic: !!...आठवणींचे गाव...!!  (Read 1259 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
!!...आठवणींचे गाव...!!
« on: December 28, 2011, 01:05:31 AM »

गेले कुठे ते दिवस आहे का तुम्हाला ठाव
लहानपणीच्या आठवणीतले हरवले ते गाव

गल्ली-बोळातून पळवत सायकलचे ते टायर
पतंग उडवताना मधेच आलेली इलेक्ट्रिकची वायर

एकच कार्टुन १७ वेळा बघून होऊन जायचे तोंडपाठ
मिकी-माउस च्या स्टिकर्सनी भरून जायचे कपाट

नदीच्या काठावर खेळलेली क्रिकेटची ती खेळी
कुत्र्याच्या पिल्लांची शेपूट ओढणारी मित्रांची टोळी

सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप
शालेय वृक्षारोपणात लावलेलं पहिलंवहिलं रोप

रविवारची ती रंगोली, चंद्रकांता अन मोगली
मित्रांच्या चर्चेत असायची शेन वॉर्नची गुगली

आठ आण्यात ४ जणांनी खाल्लेली ती चिंचेची गोळी
प्रार्थनेने सुरु होणारी ती व्यायामशाळा मराठमोळी

हरवला तो गाव राहिल्या त्या आठवणी
आयुष्यभर पुरतील अश्या त्या साठवणी ..

-- Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: !!...आठवणींचे गाव...!!
« Reply #1 on: December 28, 2011, 10:58:02 AM »
true